आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.
शून्यातून स्वराज्य निर्माण केलेले हे असामान्य व्यक्तिमत्व.
राजा कसा असावा ? या प्रश्नाचे हे राजस उत्तर !
राजांनी केलेली काही असामान्य कामे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ !
युरोपियन सेनानींच्या विषय लंपट पार्श्वभूमीवर,
पराक्रमी असूनही प्रचंड उत्तुंग चारित्र्याचा महामेरू.
शत्रूला आपल्या कक्षेत आणून पराभव करणारा,
जगातील पहिल्या क्रमांकाच्या प्रतापगड युद्धाचा सरसेनापती.
भारतीय समाजात चैतन्य फुलविणाऱ्या,
हिंदू सिंहासनाची पुनर्स्थापना करणारा पुरुषोत्तम.
मुघलांच्या जिहादी अधर्म युद्धाविरुद्ध,
गनिमी कावा या नवयुद्ध शास्त्राचा जनक.
तलवारीचे पाते अर्धा हात लांब करून,
शत्रूची साडेतीन हात कबर खणणारा नवशस्त्र शिल्पी.
युरोपियनांच्या पांढऱ्या पायांना पळविण्यासाठी,
बलाढ्य सागरी आरमाराची निर्मिती करणारा भविष्यवेधी.
स्वदेशी अर्थनीती बलवान करण्यासाठी,
होन हि स्वतः ची नाणी तयार करणारा अर्थनीतीद्न्य.
दणकट किल्ल्यांची उभारणी करतांना,
सह्याद्रीलाच अभेद्य किल्ला बनविणारा अभियन्तोत्तम.
संस्कृतोद्भव भाषांच्या संवर्धनासाठी,
राज्य व्यवहार कोशाची रचना करणारा संस्कृती संवर्धक.
डोक्यावरून मैला नेणे बंद करण्यासाठी,
पहिल्यांदा किल्ल्यांवर संडास बांधणारा समाजसुधारक.
धर्मांधांनी मुद्दाम मोडलेली देवळे,
पुन्हा त्याच ठिकाणी उभारणारा समाज उद्धारक.
प्रतापरावाचे परावर्तन करून,
त्यास जावई करून घेणारा धर्मरक्षक.
इतिहासालाही अज्ञात असलेले,
हेरखाते बाळगणारा चलाख राजेंद्र.
राजांच्या मृत्युनंतर पाच लाखांची क्रूर सेना घेऊन, सगळे अनुकूल असलेला धर्मांध
औरंगजेब लढाईसाठी दक्षिणेत उतरला. राजाच नसलेल्या दीड लाख मराठी सेनेने
प्रतिकूल परिस्थितीत, हा लढा पंचवीस वर्षे चालविला. औरंगजेबाला दक्षिणेतच
गाडला. संगठनशीलतेचे हे परमोच्च उदाहरण आहे.
राजाधीराजांना परम आदराने वंदन करताना मनात येते !
तव शौर्याचा जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श देतव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे |त्या दिप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपतपुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत ||
No comments:
Post a Comment