स्वातन्त्र्योत्तर युद्धकथा १
सदैव सैनिका पुढेच जायचे,
न मागुती तुला कधी पहायचे ।
शाळेमध्ये असताना कविता पाठ केली होती . आणि आज खरेच मागे न बघता पुढे जात होतो . १२ नोव्हेंबरची दुपार . वालोंग या चार हजार फुट उंचीवर असलेल्या ठिकाणी आम्ही होतो. एकत्र येण्याचा हुकुम झाला आणि आहे त्या स्थितीत आम्ही धावत पळत एकत्र जमलो . ' आपल्याला ' ट्राय जंक्शन ' वर हल्ला करायचा आदेश आलाय . आत्ता ताबडतोप आपण निघत आहोत . चौदा हजार फुट उंचीवर जाऊन उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . '
ब्रिगेडियर म्हणाला खरा पण आम्ही मात्र त्याच्या कडे वेड्यासारखे बघत होतो . चौदा हजार फुट उंचीवर जाऊ आम्ही ! पण ताबडतोप हल्ला कसा शक्य आहे ? सगळे जण एकमेकांकडे बघत होते . काहीजणांनी शंका व्यक्त केली . हल्ला कसा शक्य आहे ? ब्रिगेडीयरने एकच वाक्य म्हटले . ' उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . ' अधिकारयाची इच्छा म्हणजे शेवटी आज्ञाच ना !
आम्ही चालायला सुरुवात केली . चारही बाजूला डोंगरांचे सुळकेच सुळके. देवदारांची झाडे . पायथ्याशी दाट, माथ्यावर विरळ होत गेलेली . शिखरांवर बर्फ साठलेले . सूर्यप्रकाशात चकाकणारे . खाली बघितले तर मधून मधून लोहित नदी दिसे . पांढरया रेषेसारखी . मन मोहून टाकणारे दृश्य . पण पाहता न येण्याजोगे . अक्षरशः उभा डोंगर ! पाय चुकला तर ? पूर्ण कपाळमोक्षच .
रात्र झाली . काळोख पसरला . पण टोर्च पेटवायचा नाही . शत्रूला संशय येत कामा नये . चढाई मंदावली . पण सुरक्षितता वाढली . संपूर्ण रात्र आम्ही चालत होतो . पहाट झाली . शिखारांवरती सूर्याची किरणे पसरू लागली . अतिपूर्वेकडील ती किरणे . दरयामध्ये मात्र निळसर काळोखच ! भारतातले लोक मात्र अजून साखरझोपेत असतील !
ट्राय जंक्शनला आलो . आमच्या दोन्ही बाजूंना ' यलो पिंपळ ' आणि ' ग्रीन पिंपळ ' या ठाण्यावर हल्ला करायचा .चिन्यांना जिकायचे . आमचे बाहू फुरफुरू लागले . पण हे युद्ध होते . येथे उतावीळपणा नडला असता . आम्ही आणि चीनी यांच्यात केवळ अर्ध्या किमीचे अंतर असेल . त्यांना आमची काहीच कल्पना नव्हती . ते आपले झाडे तोडण्यात, खंदक तयार करण्यात गुंग झालेले . आपापसात मोठमोठ्याने बोलत असलेले .
आता विश्रांती . थोडे खंदक,खड्डे यांची तयारी . मनात विचार चाललेला होता . इतक्यात वायरलेस वाजू लागला . ' हेलो, ब्रेव्हो, पापा रिपोर्ट माइन ओव्हर ' कमांडर ओफिसरने उत्तर दिले . ' रिपोर्ट ओव्हर ' सूचनांची देवाण घेवाण सूरु झाली . बातमी थडकली . आता लवकरच १० वाजता हल्ला करायचा . दिवसाच धडक द्यायची .
आम्ही आमची घड्याळे लावून घेतली . हेवरसेक भरल्या . जड सामान उतरून ठेवले . अत्यंत सावधगिरीने, शत्रूला जराही सुगावा लागू न देता चालायला सुरुवात केली . कधी झटक्यात, कधी नागमोडी, कधी गुढग्यावर तर कधी कोपरांवर क्रव्लिंग करीत आम्ही पुढे सरकत होतो . वाटेत चीनी सैनिकांनी माईन्स, सुरुंग लावलेले नाहीत ना याचीही खात्री करून घ्यावी लागत होती . अगदी शत्रूच्या नाकासमोर जाऊन आम्ही ठाण मांडले .
भारतीय सैन्याचे एक वैशिष्ट्य आहे . इथे अधिकारी केवळ आज्ञा देत नाहीत . धुमश्चक्रीच्या वेळी ते सर्वात पुढे असतात . म्हणूनच ते युद्ध जिंकतात ना ? मी थोडा पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करू लागलो . सुभेदार गोविंदसिह माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू लागले . मी त्यांना येऊ नका असे सांगत होतो . पण . . . चिन्यांनी त्यांना पहिले आणि क्षणार्धात माशिन्गंस धडधडल्या . आग ओकू लागल्या . गोविंदसिह धारातीर्थी पडले होते . जणू ते म्हणत होते . ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । '
दुखः व्यक्त करायला वेळ होताच कोठे ? मी मागे संदेश पाठविला ' चीनी सावध झालेत . अधिकारयानी निर्णय घेतला आणि भारतीय सैन्याने आक्रमणाला प्रारंभ केला . अत्यंत विषम परिस्थिती . आम्ही एक तर चीनी पाच . त्यांची शस्त्रेही अत्याधुनिक . तरिहि आम्ही भारी पडत होतो . माझ्या प्लेट्यूनचा लान्सनाईक देवदत्त डोळ्यात खून उतरलेला . ' साब मुझे जाने दो ! चार-पाच चीनी तो मुझे मारनाही चाहिये । ' आणि धावला वेडा .
इकडे मीही सरकत होतो . एका मोठ्या झाडाचा आधार घेत जात होतो . चीनी गोळ्या शरीराजवळून सुसाट जात होत्या . तोफांचे गोळे झाडांच्या फांद्या, छोटी झुडुपे तर पूर्ण उखडून टाकीत होत्या . आणि अकस्मात मार्याच्या टप्प्यात एक चीनी दिसला . संधी थोडाच सोडणार मी ? झाडली गोळी . चीनी मेला पण शत्रूला माझा सुगावा लागला . माझे झाड आगीने भाजले जाऊ लागले . गोळ्यांचा अक्षरशहः वर्षाव . त्या वर्षावाने झाडाची साल तर सोडाच खोडाचेही तुकडे माझ्या अंगावर पडू लागले . आजूबाजूने आवाज येऊ लागले ' अरे चवानसाब मर गया । अरे चवानसाब मर गया_ '
युद्धाचे काही संकेत असतात . पुढे नाही जाता आले तरी आहे तेथे दृढ टिकून राहायचे . मोर्चा सोडायचा नाही . आम्ही तसेच केले . आणि ' यलो पिंपळ ' वरून आम्ही चिन्यांना हुसकून लावू शकलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठाणे आम्ही तोफखान्याची मदत न घेता जिंकले . बिरबल म्हणत असे ' शस्त्र कोणते श्रेष्ठ ? जे वेळेवर हाती मिळेल ते ! ' ' नेपोलियन नेहमी सांगे ' युद्धात शस्त्र लढत असते, पण त्यापेक्षा खरे लढते ते मन, हृदय ! ' मला कवीच्या त्या फुलाची आठवण आली
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।।

No comments:
Post a Comment